अनेक नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी मालदीवला पसंती देतात. लग्नानंतर भारताबाहेर फिरायला जाण्याच्या यादीत मालदीवचं नाव पहिलं असतं.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, हनिमूनर्सची पसंती असलेल्या मालदिवमध्ये सर्वाधिक घटस्फोट होतात.
मालदिवमध्ये सर्वात जास्त घटस्फोट होतात. याबाबतील मालदिवने अमेरिका आणि भारतालाही मागे टाकलं आहे.
जगभरात सर्वाधिक घटस्फोटांच्या बाबतीत मालदीव पहिल्या क्रमांकावर आहे. मालदीवमध्ये दर 1000 लग्नांपैकी 5.52 टक्के जोडप्यांचा घटस्फोट होतो.
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बेलारुस असून तेथील घटस्फोटाचं प्रमाण 4.63 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेत 2.39 टक्के इतकं घटस्फोटाचं प्रमाण आहे.
हिंदी महासागरात वसलेल्या या छोट्याशा देशात घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
जागतिक घटस्फोटाच्या आकडेवारीनुसार, मालदीवमध्ये सध्या दर हजार विवाहांमागे 5.52 घटस्फोट होत आहेत.
हा डेटा अमेरिका, कॅनडा किंवा कोणत्याही देशापेक्षा खूप जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, येथील 30 वर्षांच्या महिलांचा सरासरी तीन वेळा घटस्फोट झालेला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, येथील मच्छीमार दूर समुद्रात मासेमारीसाठी आणि इतर देशात व्यापारासाठी जातात. हे मच्छिमार कधी आणि केव्हा घरी परततील याची काहीही माहिती नसते.
त्यामुळे प्राचीन काळापासून येथील लोक मासेमारी किंवा व्यापारासाठी जाताना पत्नीला घटस्फोट देतात. हे फार पूर्वीपासून चालत आलेले आहे.
पती आणि पत्नी जास्त कालावधीसाठी दूर राहिल्यानंतर त्यांना त्याच जोडीदाराबरोबर आयुष्य घालवू अशी आशा नसते.
त्यामुळे त्यांना नैतिकतेमध्ये अडकून राहणं आवडत नाही, परिणामी येथे घटस्फोटांचं प्रमाण अधिक आहे.