काय सांगता? मानवाचे पूर्वज डायनोसॉरसोबत फिरायचे, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
काय सांगता? मानवाचे पूर्वज डायनोसॉरसोबत फिरायचे, नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
मानवाची उत्क्रांती डायनासॉरच्या मृत्यूपूर्वी म्हणजे डायनासॉर विलुप्त होण्यापूर्वी झाली की नंतर हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
पण आता या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं म्हटलं जात आहे. मानवाचे पूर्वज डायनासॉरसोबत राहायचे, असा दावा संशोधकांनी केला आहे.
नवीन अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील फ्रिबोर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनाच्या आधारे ही माहिती उघड केली आहे.
या संशोधनानुसार, डायनासॉर आणि मानव यांचं एकाच वेळी पृथ्वीवर होतं असा दावा केला जात आहे.
या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, 66 दशलक्ष वर्षांपूर्वी लघुग्रहामुळे डायनॉसोर मारले गेले होते.
त्यावेळी सस्तन प्राणी अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा आधी सापडला नव्हता. त्यामुळे प्लेसेंटल सस्तन प्राणी हे मानवाचे सर्वात प्राचीन पूर्वज मानलं जात होतं
पण आता जीवाश्मांच्या तपासणीदरम्यान, मॉलिक्यूलर क्लॉक डेटावरून नवी माहिती समोर आली आहे.
यानुसार, डायनासॉरच्या वेळी मानवीचा वंश अस्तित्वात होता. त्याकाळी मानव डायनासोरसोबत पृथ्वीवर जीवन जगत होता, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.