अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील हार्बरमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकाचं नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिला होता. 4 जुलै 1776 रोजी संयुक्त राज्य अमेरिकेला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्सने अमेरिकेला ही 'ग्रेट' भेट दिली होती. फ्रान्सने 1876 मध्ये अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट दिला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक मानलं जातं. 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'चा अर्थ स्वातंत्र्याचा पुतळा असं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुमारे 136 वर्ष जुना आहे. 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. या पुतळ्याचा मूळ रंग तपकिरी होता. पण, बदलत्या वातावरणामुळे तांब्याच्या आवरणाचा रंग बदलून हिरवा झाला.