तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात

7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) सुरू होत आहे

व्हॅलेंटाईन वीकमधील पहिला दिवस म्हणजे रोज डे. या दिवशी प्रेमा जोडपे एकमेकांना लाल गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात

व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात

व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. ज्यामध्ये जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतात

व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना टेडी बेअर भेट देतात.

पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला सदैव तुमच्यासोबत राहण्याचे, त्यांना आनंदी ठेवण्याचे आणि बरेच काही वचन देऊ शकता.

व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.

प्रेम व्यक्त करताना आणि शब्दांनी प्रेम व्यक्त करता येत नसताना, प्रेमळ चुंबनाने प्रियकर खूप काही सांगू शकतो. म्हणूनच किस डे साजरा केला जातो.