लसूण जेवणाची चव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि ती आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. काही वेळा लोक औषध म्हणूनही लसूण खातात. त्याच वेळी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील लसणाचे सेवन केले जाते.



लसणामध्ये ऍलिसिन नावाचा अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक आहे. याशिवाय लसणात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड विशेष प्रमाणात आढळते.



लसणात सल्फर असल्याने त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे. पण, लसणाचे जास्त सेवन केल्यास ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते.



जर, तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल आणि त्याच वेळी तुम्ही लसणाचे सेवन केले, तर ती आणखी वाढू शकते.



ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी लसूण जास्त खाऊ नये, असा सल्लाही दिला जातो. पोटाची समस्या असताना जर कोणी लसणाचे सेवन केले, तर त्यांना अॅसिडिटीचा सामना करावा लागू शकतो.



लसणात सल्फरचे प्रमाणही जास्त असते आणि त्यामुळे ते अॅलर्जीचे कारण बनते. त्यामुळे ज्यांना आधीच अॅलर्जी समस्या आहे, त्यांनीही लसणाचे सेवन टाळावे.