पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील शिक्रापूर येथे विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातात जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे 24 वा मैल या ठिकाणी भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं नगरच्या दिशेनं जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला पलटी झाला. त्यावेळी पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकनं जोरदार धडक दिली. अशी प्राथमिक माहिती आहे.