अभिनेत्री कतरिना कैफ सुट्टीसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. यावेळी कतरिना बीचवर अतिशय शानदार फोटो पोज देताना दिसली. या फोटोंमध्ये कतरिना कैफने हिरव्या रंगाचा झेब्रा प्रिंट शर्ट घातलेला दिसत आहे आणि यासोबतच तिने प्रिंटेड व्हाईट बिकिनी परिधान केली आहे. कतरिना कैफने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये मालदीवला तिचे #happyplace असे म्हटले आहे. मालदीव कतरिना कैफचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन आहे. कतरिना अनेकदा तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुट्टीवर जाते. मालदीवच्या बीचवर वाळूत बसलेल्या कतरिनाचा हा फोटो अतिशय सुंदर आहे.