कंगना मथुरेत कृष्ण जन्मभूमीत पोहोचली आहे. मथुरेतले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने दर्शनासाठी गडद हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. कंगना लवकरच आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर कंगना नेहमीच तिची मतं व्यक्त करत असते.