सह्याद्रीवर धुक्यांची चादर ; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य गेल्या तीन दिवसापासून निसर्गानं सह्याद्रीच्या पर्वतरांगाना पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसानं उघडीप दिल्यानंतर मात्र या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वेगळंच रूप दिसू लागलय साताऱ्यातील पाचगणीतील हा नजारा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा. वेगवेगळी रूप दाखवणाऱ्या या निसर्गाला कधी कधी आपण दोष देत असतो तर कधी कधी आपण या निसर्गाच्या नयनरम्य दृष्यात आनंदाने भारावून जातो. पाचगणी च्या परिसरातील हे नयनरम्य दृष्य आज लोकांना पहायला मिळत आहे. सकाळपासून धुक्याची चादर असताना आता ढगांचे लोट वेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळत आहेत. जनु या ढगांनी या सह्याद्रीच्या पर्वत रांगाना आपल्या कुशीत घेतला आहे. सह्याद्रीवर धुक्यांची चादर