केळं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ मानले जाते. कारण त्यात अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात.
तुम्ही बऱ्याचदा हिरवी आणि पिवळी केळी पाहिली असतील. पण तुम्ही कधी लाल रंगाची केळी पाहिली आहे का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पिवळ्या केळीपेक्षा लाल केळ्यामध्ये जास्त पोषक तत्वे आढळतात. यामुळेच त्यांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार टाळता येतात.
लाल रंगाच्या केळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची साल लाल रंगाची असते. तर त्याचा आतील भाग पिवळ्या केळ्यासारखाच पांढरा असतो.
या केळ्याचे सर्वाधिक उत्पादन दक्षिण-पूर्व आशियामध्ये आहे. पिवळ्या केळ्याप्रमाणे ही केळीही चवीला गोड असतात.
मधुमेहाचे रुग्णही लाल केळीचे सेवन करु शकतात. लाल केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
याचे दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
लाल केळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळेच उच्च रक्तदाबाचे रुग्णही ही केळी बिनदिक्कत खाऊ शकतात.
कमकुवत दृष्टी असणाऱ्यांनीही या केळीचे सेवन करावे. कारण लाल केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.
लाल केळी खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय, ते किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाल केळीमुळे कॅन्सरसारख्या घातक रोगाचा धोका देखील कमी होतो. हृदयविकाराने त्रस्त असलेले लोकही याचे सेवन करु शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.