काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारूकी हा लॉक अप या कार्यक्रमाचा विजेता ठरला. त्यानंतर मुनव्वरनं एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोमधील ही मिस्ट्री गर्ल कोण आहे?असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.



आता नाझीलनं मुनव्वर फारूकीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.



फोटोमध्ये मुनव्वर हा नाझीलला गुलाबाची फुलं देताना दिसत आहे.



नाझीलनं काही फुलांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



नाझीलच्या वाढदिवसानिमित्त मुनव्वरनं तिला हे खास सरप्राइज दिलं.



बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो देखील नाझीलनं सोशल मीडियावर शेअर केले.



मुनव्वरनं दिलेल्या गुलाबांच्या फुलांचा फोटोंचा देखील नाझीलनं शेअर केला.



नाझीलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पिंक टी-शर्ट आणि ब्लू शॉर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे.



नाझीलनं तिच्या बर्थ-डेच्या केकचा देखील फोटो शेअर केला.



फोटोमध्ये नाझील आणि मुनव्वरचा रोमँटिक अंदाज दिसला.