अन्वी कामदार ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. ती मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती. अन्वी लाईफस्टाईल आणि टूरिझम संदर्भातील Vlog करत होती. तिने देशभरातील अनेक पर्यटनस्थळांची भटकंती केली होती. तिच्या व्हिडीओ, रील्सवर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. अन्वी तिच्या फॉलोअर्सना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणची माहिती देत असे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेली अन्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध होती. अन्वी ही बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या डेलॉईट कंपनीत नोकरी करत होती. अन्वीने सोशल मीडियावर पॅशनने रील्स तयार केले. त्याच रील्सपायी तिने आपले प्राण गमावले.