जलवाहिनी दुरूस्ती करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
1450 मिलीमीटरची जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेतलं जाणार आहे.
नागरिकांनी पाणीचा साठा करून ठेवावा, असं महानगरपालिकेने म्हटलं आहे.
28 नोव्हेंबर रात्री 10, ते 29 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत जलवाहिनी दुरूस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहणार.
मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील जलवाहिनी दुरूस्ती करण्यात येणार आहे.
22 तासांच्या या कालावधीत पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
आसपासच्या काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर मार्ग, करी रोड,बी. डी. डी. चाळ, एन. एम. जोशी मार्ग या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार.