लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली आहे. भाविकांनी गणेशोत्सवातील दहा दिवसात लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रोख रुपये दान केले आहेत. 7 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत लालबाग राजा चरणी आलेल्या रोख रकमेची मोजदाद सुरु होती. ही मोजदाद पूर्ण झाली आहे. लालबागच्या राजाच्या गणेशाची विसर्जन मिरणूक 17 सप्टेंबरला सुरु झाली ती 18 सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपली. आता लालबागच्या राजाला मिळालेलं दान मोजून पूर्ण झालं आहे. लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रुपयाचे रोख रकमेचे दान भाविकांनी केलं आहे. तर, 4151.360 ग्रॅम सोनं लालबागच्या राजा चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलं आहे. तर 64321 ग्राम चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान म्हणून अर्पण करण्यात आली आहे,