रतन टाटा (Ratan Tata Death) यांनी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवलेल्या टाटा ट्रस्टचा (Tata Trust) नवा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Google

टाटा ट्रस्टच्या संचालकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

Image Source: Google

त्यामुळे आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असतील. रतन टाटा हे 1991 पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते.

Image Source: Google

त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आणले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर ही धुरा आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर आली आहे..

Image Source: Google

कोण आहेत नोएल टाटा?

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं.

Image Source: Google

1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे.

Image Source: Google

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.

Image Source: Google

दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पॅरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत.

Image Source: Google

टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्त्वात ट्रेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला.

Image Source: Google

टाटा सन्सचा कारभार एन. चंद्रशेखरन

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे कोणाकरे सोपवायचा हे ठरवण्यासाठी आज (11 ऑक्टोबर) टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची मुंबईत बैठक झाली.

Image Source: Google

या बैठकीत नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सध्या टाटा सन्सचा कारभार हा एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांच्याकडे आहे.

Image Source: Google

तर टाटा ट्रस्टची तमा ही टाटा कुटुंबियांकडेच असेल.

Image Source: Google