तमाम गणेशभक्तांच्या श्रद्धेचं स्थान असलेला लालबागच्या राजाचं जवळपास 23 तासांनी विसर्जन झालं आहे.
Image Source: Youtube
पुढच्या वर्षी लवकर या... चैन पडे ना आम्हाला... अशी भावनिक साद घालत लालबागच्या राजाला भाविकांनी निरोप दिला आहे.
Image Source: Youtube
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच संपूर्ण गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागच्या राजाने दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला आहे.
Image Source: Youtube
बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली होती, संपूर्ण यंत्रणाही सज्ज होती.
Image Source: Youtube
मंगळवारी सकाळी साधारण 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता.
Image Source: Youtube
नंतर लालबागचा राजा हा लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग,चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा,
Image Source: Youtube
डंकन रोड, दोन टाकी, कुंभारवाडा,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी.टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस असा प्रवास करुन गिरगाव चौपाटीवर दाखल होतो.
Image Source: Youtube
गेल्या 10 दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि बॉलीवूड तारे-तारकांनी लालबागचा राजाच्या मंडपात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.
Image Source: Youtube
अखेर सर्वांना आशीर्वाद देत लालबागच्या राजाने भावपूर्ण वातावरणात भक्तांचा निरोप घेतला आहे.