मुंबईतील माहीम पोलिस स्टेशनजवळ अजगर दिसल्याने एकच खळबळ उडाली.
पोलिस स्टेशनच्या आवारात भला मोठा अजगर दिसल्याने उपस्थितांमध्ये चांगलीच खळबळ माजली.
माहीम पोलिस स्टेशनजवळ सुमारे 7 फुटाचा अजगर आढळला.
सर्पमित्राला बोलावून अजगराला पकडण्यात आलं.
सर्पमित्राने अजगराला पकडलं आणि वनाधिकारी सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.
एवढ्या गजबजलेल्या परिसरात एवढा मोठा अजगर पोहोचला कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याआधीही माहीम परिसरात अजगर सापडला आहे.
माहीम पोलीस ठाणे समुद्र किनाऱ्याजवळ आहे. समुद्र किनारा जिथे मिठी नदी मिळते.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात अनेक अजगर आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलातून निघणाऱ्या मिठी नदीत अनेकदा अजगर वाहून जातात.
मिठी नदीच्या प्रवाहाने माहीमच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचतात.
अजगर समुद्र किनाऱ्यावरून रेंगाळत पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचला असावा, असा अंदाज आहे.