332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: ABP Network

कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली.

Image Source: ABP Network

बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Image Source: ABP Network

या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती.

Image Source: ABP Network

त्यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Image Source: ABP Network

अपघातात मृतांचा आकडा 7 तर जखमी 49 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Image Source: ABP Network

विजय गायकवाड, आफ्रीन शहा, अनम शेख, कणीस कादरी, शिवम कश्यप अशी मृतांची नावं आहेत तर अद्याप दोन जणांची नावे कळाली नाही.

Image Source: ABP Network

अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Image Source: ABP Network

बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला पोलिसांनी अटक केली आहे.

Image Source: ABP Network

बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Image Source: ABP Network

या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत.

Image Source: ABP Network