महाराष्ट्राला आज 21 वे मुख्यमंत्री मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पगार किती असेल? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन 3.4 लाख रुपये प्रति महिना आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केलं जातं. यापूर्वी 2016 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन दरमहा 2.25 लाख रुपये होते.