महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला. त्यानंतर आता महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती.
मात्र, निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि त्यातच फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे नाराज असल्यामुळे ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत, असं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
शिंदे गट गृहखाते आणि नगरविकास खात्याससाठी आग्रही असल्याचं समोर येत आहे.