देवेंद्र फडणवीस किंवा लाखो लाडक्या बहिणींचे लाडके 'देवाभाऊ' यांचे हजारो फोटो तुम्ही आजवर पाहिले असाल. पण, तुम्ही देवाभाऊंचे मॉडेलिंगचे फोटो पाहिलात का?

कधी काळी याच देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून विशेष फोटोशूट ही करून घेतला होता.

राजकीय प्रचाराच्या होर्डिंगवर हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असाल.

देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही टीव्हीवर आणि प्रत्यक्षात ही अनेक वेळेला पाहिले असेल, पण त्यांचा एक वेगळा अंदाज समोर आला आहे.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी कधीकाळी मॉडेलिंग ही केली होती.

2004 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस ह्यांना त्यांच्या नागपुरातील मित्रांनी मॉडेलिंग करण्याचा आग्रह केला होता.

सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यासाठी तयार झाले नाही. मात्र, नंतर मित्रांच्या हट्टापायी त्यांनी मॉडेलिंग करण्यास होकार दिला.

नागपूरचे फैशन फोटोग्राफर विवेक रानडे यांच्या स्टुडियोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मॉडेल म्हणून फोटोशूट झालं.

ब्लेझर, शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा अशा विविध लूकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फोटोशूट केलं.

सुरुवातीला मॉडेल म्हणून कॅमेरा समोर फडणवीस काहीशे काहीशे संकोचले होते..मात्र, हळूहळू त्यांनी सर्व संकोच त्यागत फडणवीसांनी एकापेक्षा एक सरस पोझ दिले.

एका राजकीय नेत्याचा मॉडेल म्हणून झालेला तो पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला होता.

त्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या काही विशिष्ट पोशाखातील होर्डिंग्स नागपुरात विविध ठिकाणी लागले होते.