सध्या महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी जोरदार सुरु आहे.
खातेवाटपावरुन महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय.
दरम्यान, असं असलं तरी भाजप पदश्रेष्ठींकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांची माहिती आहे.
त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मुंबईत फडणवीसांच्या नावाचे पोस्टर लावत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील दादर परिसरात देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले.
बॅनरवर ‘मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपत घेतो की, महाराष्ट्राच्या सुख समृद्धी शांति साठी कठीबद्ध राहीन’ असा आशय लिहिण्यात आला आहे.
दादर येथील प्लाझा सिनेमागृहाच्या चौकात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भाजपच्या युवा उपाध्यक्षांकडून हील बॅनरबाजी करण्यात आली आहे.
महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.