एक रहेंगे तो सेफ रहेंगे! भाजप, राष्ट्रवादीकडून शपथविधीसाठी खास टीशर्ट
नव्या सरकारचा शपथविधी पार पडण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.
5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी मोठ्या थाटात पार पडणात आहे.
यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांच्या पदरात मुख्यमंत्री पद आहे.
राज्याला आता नवा मुख्यमंत्री मिळणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.
शपथविधीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीने खास टीशर्ट छापल्याची माहिती आहे.
भाजपकडून 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे'चे शपथविधीसाठी टीशर्ट छापण्यात आले आहेत.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घालणार गुलाबी रंगाचे टीशर्ट आणि फेटे घालणार आहेत.
निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता.
पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या आणि गुलाबी रंगाचे फेटे वापरण्याचे आदेश देण्यात आला आहे.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे फक्त राज्याचं नाही, तर देशाचं लक्ष लागलं आहे.