मुंबईतील प्रतिक्षीत बाप्पाचा आगमन सोहळा आज पार पडला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी दरबारामध्ये विराजमान झाला आहे. मुंबईतील बहुप्रतिष्ठीत चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा गाजावाजात पार पडला. यंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके आहे. लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं 105वं वर्ष आहे. बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक. त्यामुळे चिंतामणी गणपती गणेशोत्सव काळात भक्तांचं विशेष आकर्षण आहे.