मुंबईत सोमवारी सकाळी भयानक रेल्वे अपघात घडला.

Published by: जयदीप मेढे
Image Source: UNSPLASH

दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशी एकमेकांना धडकून ट्रेनमधून खाली पडले, पाच प्रवाशांचा मृत्यू

Image Source: UNSPLASH

अपघातानंतर मध्य रेल्वेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

Image Source: UNSPLASH

या अपघातानंतर मध्य रेल्वेने आता भविष्यात ऑटोमॅटिक डोअरच्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Source: UNSPLASH

रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे की मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जातील.

Image Source: UNSPLASH

याशिवाय सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे पुनर्रचना (रीडिझाईनिंग) करण्यात येणार आहे

Image Source: UNSPLASH

नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.

Image Source: UNSPLASH

यामध्ये नव्या 238 गाड्यांचा आणि एसी लोकलचा समावेश असेल.

Image Source: UNSPLASH

तसेच सध्याच्या लोकल ट्रेनलाही दरवाजे लावण्याबाबतही विचार केला जाईल,

Image Source: UNSPLASH

अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.

Image Source: UNSPLASH

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: UNSPLASH