मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी घुसलं!

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: ABP Majha

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वा लाईन सुरु केली होती.

आरे ते वरळी असा मार्ग असणारी ॲक्वा लाईन (Metro Aqua line) भुयारी मार्गाने धावते.

Image Source: ABP Majha

पावसाचे पाणी हे भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले.

आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे.

Image Source: ABP Majha

आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य अत्रे या स्थानकाची दुरावस्था झाली आहे.

पहिल्याच पावसात अवघ्या काही तासांत भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयाण अवस्था झाली आहे.

Image Source: ABP Majha

एवढेच नव्हे तर भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी शिरल्याने येथील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे.

Image Source: ABP Majha

पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकातील अनेक गोष्टी निकामी झाल्याचे दिसून आले.

Image Source: ABP Majha

त्यामुळे या वस्तू भंगारात विकण्याच्या लायकीच्या झाल्या आहेत. सध्या मेट्रो प्रशासनाने अॅक्वा लाईन बंद केली आहे.

Image Source: ABP Majha