पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABP Majha

सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

हवामान खात्याने मुंबईला यलो अलर्ट दिला असून

काही तास मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील!

Image Source: Abp Majha

काही तासांमधील पावसामुळे आताच मुंबईतील सखल भाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे.

सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे.

Image Source: ABP Majha

आता समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा बंद होऊन मुंबईत आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP Majha

माटुंगा, मस्जिद बंदर या रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात साचलेले पाणी आता फलटाच्या उंचीच्या जवळपास पोहोचल्याने येथील वाहतूक कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP Majha

तर जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

Image Source: ABP Majha

त्यामुळे सकाळच्या वेळेत कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Image Source: ABP Majha

तर पूर्व द्रुतगती महार्गावर आणि एलबीएस मार्गावर भांडूप, कांजूर आणि सायन परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

Image Source: ABP Majha