मुंबईसह राज्यातही काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.

दमदार पावसाने काही जिल्ह्यातील बळीराजा सुखावला.

तर, काही ठिकाणी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावलीय भिवंडी,

अंबरनाथमध्ये पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले.

वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे.

विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.