मुंबईच्या पश्चिम उपनगरात तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू पावसाचं पाणी साचल्यानं अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे पश्चिम उपनगरात अंधेरी, दहिसर या परिसरामध्ये सध्या मुसळाधार पाऊस सुरू सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली पावसाचा रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला वाहतूक व्यवस्था एस. व्ही. रोडच्या दिशेने वळवण्यात आली आहे अंधेरी पूर्व येथील असल्फा साकीनाका जंक्शन येथे पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली अतिवृष्टी झाल्यास अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून दोन ते तीन वेळा या ठिकाणी पाणी साचले