पाच दिवसात मुंबईत पावसानं सरासरी ओलांडली



मुंबईतील सांताक्रुजमध्ये 1 जूनपासून आतापर्यंत 549.6 मिमी पावसाची नोंद



दरवर्षी जून महिन्यात 537.1 मिमी पावसाची नोंद होत असते



मात्र मागील काही दिवसात होत असलेल्या पावसाने सरासरी गाठली आहे



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात देखील चांगला पाऊस होत आहे



सातही धरणांचा एकूण पाणीसाठा 10.88 टक्क्यांवर पोहोचलाय



दरम्यान, सांताक्रुज वेधशाळेत जरी सरासरी ओलांडली



मात्र कुलाब्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय



कुलाब्यात 1 जूनपासून 424.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे



दरवर्षी जून महिन्यात कुलाब्यात सरासरी 542.3 मिमी पावसाची नोंद होत असते