मुंबईत सध्या मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात काळ्या ढगांनी दाटी केली आहे.. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे मुंबईसह आसपासच्या परिसरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.