अयोध्येतील राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं
15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते.
प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं जाईल
असं नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील
मिश्रा पुढे म्हणाले की, 24 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.
राम मंदिरातील गाभाऱ्याच्या मुख्यद्वारावर सोन्याचं कोरीव काम असणार आहे
तसंच मंदिराचा 161 फुटांचा कळसालाही सोन्याचं आच्छादन असेल.
परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु