मुंबईत आज दुसऱ्या दिवशीही गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु आहे.

काल सकाळी दहाच्या सुमारास लालबागच्या राजासह अनेक मोठ्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती.

आज दुसऱ्या दिवशी देखील भाविकांचा उत्साह दांडगा आहे.

बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गिरगाव चौपाटीवर हजेरी लावली आहे.

विसर्जनासाठी निघालेला ताडदेवाचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे.

तर लालबागचा राजा देखील गिरगाव चौपाटीजवळ दाखल झाला आहे.

सध्या समुद्राला ओहोटी असल्याने चौपाटीवर दाखल केलेले गणपती विसर्जन रांगेत आहेत.

समुद्राला भरती आल्यानंतरच विसर्जनाला सुरुवात होणार आहे.

तत्पूर्वी भाविकांचा उत्साह मात्र कुठेही कमी झालेला नाही.

20 तासांनंतरही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु आहे.

काल दुपारी सुरु झालेली मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे.