गिरगाव चौपाटीवर मुंबईतील सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपतींचे विसर्जन होते.



त्यामुळे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला असल्याचं पाहायला मिळालं आहे.



अनेक घरगुती गणपतींचे देखील विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते असते.



तर अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती देखील आता गिरगाव चौपाटीवर पोहचण्यास सुरुवात झालीये.



गिरगाव समुद्रकिनारी आता विसर्जनासाठी भाविकांची गर्दी आता मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झालेली आहे.



या समुद्रकिनारी घरगुती त्याचबरोबर मोठ्या मंडळांचे गणपतींचे विसर्जन देखील करण्यात येत आहे.



हे सर्व भक्तिमय वातावरण पाहण्यासाठी मुंबई त्याचबरोबर इतर शहरातून भाविक मोठ्या प्रमाणावर गिरगाव चौपाटीवर पोहचले आहेत.



तर लालबागचा राजा, मुंबईचा राजा देखील गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.



तर यावेळी गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.