मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतले

यावेळी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

सचिन तेंडुलकरने यावेळी आरती केली.

यावेळी सचिन तेंडुलकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तसेच गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती भेट देत सत्कार केला.

यंदा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली

तसेच गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक राजकीय नेत्यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले

वर्षा या शासकीय निवासस्थानबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ठाण्याच्या घरी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती.

ठाण्यातील घरीही मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला

दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.