आज अनंत चतुर्दशी निमित्त वर्षा बंगल्यावरही बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं.



पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात करण्यात आलं.



खासदार श्रीकांत शिंदे यांनी हौदात उतरुन यावेळी बाप्पाचं विसर्जन केलं.



राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.



मुख्यमंत्री यांची पत्नी, सून आणि नातू देखील यावेळी उपस्थित होते.



दहा दिवस पाहुणचार घेऊन बाप्पाला आज निरोप देण्यात आला.



दरम्यान वर्षा निवासस्थानी अनेकांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.



याच बाप्पाला आज मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने निरोप दिला.



दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.