मुंबईतील अनेक महत्वाच्या भागात वीज गायब झाली होती. सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अंटोप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अर्ध्या ते एक तासापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे लोकल ट्रेन देखील ठप्प झाल्या होत्या. मुलुंडमधील ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबलमध्ये तांत्रिक अडचण निर्मा झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. मुंबईच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत, टाटाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. एका तासातनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वे काही काळ ठप्प झाली होती.