संजीदाचा आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडीओचेही चाहत्यांकडून कौतुक होत आहे. संजीदाने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. संजीदा पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंतवा' या सुपरहिट गाण्यावर पोझ देत आहे. यावेळी तिने साइड स्लिट ब्लॅक गाऊन घातला आहे. इन्स्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याआधीही संजीदाने 'पुष्पा'च्या गाण्याचा असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. संजीदा शेखचे इन्स्टाग्रामवर 44 लाख फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. संजीदा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सध्या ती पंजाबी चित्रपट 'मैं ते बापू'मुळे चर्चेत आहे.