मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा मुंबई पोलीस SET तयार करुन तपास करत होते. परंतु आता मुंबई पोलिसांनी चौकशी तुर्तास थांबवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अनेकदा समन्स बजावल्यानंतरही बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहिली नाही. तसेच मुंबई पोलीस एनसीबीच्या विजेलंस टीमच्या तपासाच्या अहवालाची वाट पाहत आहेत. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पूजा ददलानीनं आपल्या प्रकृतीची सबब देत पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणं टाळलं. मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यातच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोप-प्रत्यारोप समोर आल्यानंतर तपास करण्यासाठी SET स्थापन केली होती. सध्या आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरुच आहे.