इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या विश्वचषकात (ICC Cricket World Cup 2019) भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) इतिहास रचला होता.



या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला होता.



मात्र, रोहित शर्मानं तडाखेबाज फलंदाजी करत मैदान गाजवलं होतं.



या विश्वचषकात आजच्या दिवशी म्हणजेच 6 जुलै 2019 मध्ये श्रीलंकाविरुद्ध साखळी सामन्यात रोहित शर्मानं पाचवं शतक ठोकून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.



दरम्यान, 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा नावाचं वादळ घोंगावलं होतं.



या विश्वचषकात त्यानं पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली.



त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध 140, इंग्लंडविरुद्ध 102, बांग्लादेशविरुद्ध 104 आणि श्रीलंकेविरुद्ध 103 धावांची खेळी करत विश्वविक्रम रचला होता.



या कामगिरीसह रोहित शर्मानं श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला.



संगकारानं 2015 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकात 4 शतक झळकावली होती.