मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 383 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत बुधवारी 383 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 97 हजार 202 वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 3006 सक्रिय रुग्ण आहेत.