हळदीचा वापर लग्नापूर्वी किंवा पूजा करताना धार्मिक कार्यासाठी केला जातो हळद त्वचेचीदेखील काळजी घेत असते. हळदीच्या सेवनामुळे आरोग्याची हानी होत असते. हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म आजारांपासून वाचवण्याचे काम करतात. हळदीचे जास्त सेवन केल्याने स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते. कारण हळदीमध्ये ऑक्सलेट असते. हळदीत कर्क्युमिन घटकामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेक वेळा उलट्यांचा त्रासही होऊ लागतो. पण ही समस्या तेव्हाच उद्भवते जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात हळदीचे सेवन करता. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.