मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे.

आज मुंबईत 1648 रुग्णांची नोंद झाली आहे.

वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 2291 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 66 हजार 294 वर पोहोचली आहे.

मागील 24 तासांत मुंबईत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत आढळलेल्या नव्या 1648 रुग्णांमध्ये 1557 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे.

रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 371 दिवसांवर गेला आहे.