मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे.

मुंबईत आज 104 रुग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत रविवारी 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,253 वर पोहोचली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,725 झाली आहे.

सध्या मुंबईत 1,071 रुग्ण आहेत.