रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे.

मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.  

मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेलं हे भयाण वास्तव आहे.  

मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावातील (Murbad News) सरपंच आणि एका गावकऱ्याला सर्पदंश झाला होता.

सर्पदंश झाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात जायचं न्यायचं होतं,

मात्र गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हतं. 

अखेर गावकऱ्यांनी या दोघांना डोली करत रुग्णालयात नेलं.

मात्र रुग्णालयात न्यायला उशीर झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

बारका बाई हिलम या ओजीवले गावाच्या सरपंच होत्या.

त्या शेतात काम करत असताना 8 ऑगस्ट रोजी त्यांना शेतात सर्प दंश झाला.