गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं



मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणाशी जाऊन भक्तांना बाप्पाचं रुप डोळे भरून पाहता आलं. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी दहा दिवस भक्तांनी गर्दी केली होती



मुंबईत लालबागच्या राजाला भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे



भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे



याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडं असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिले आहेत



चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्या आहेत



लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव होणार आहे.



लालबागच्या राजाची नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती आहे



दरवर्षी लाखो भक्तगण बाप्पाच्या चरणी दान देतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक गर्दी करतात



रवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते