महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणारा रवींद्र जाडेजा तिसरा कर्णधार ठरणार आहे. 33 वर्षाचा रवींद्र जाडेजा 2012 मध्ये चेन्नईच्या संघात सामील झाला होता. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं 213 पैकी 130 सामने जिंकले आहेत.