बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मी यावर्षी त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे.

‘फुटपाथ’ या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर 2004मध्ये आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातून इमरान हाश्मीला एक वेगळी ओळख मिळाली.

‘राज 3’, ‘मर्डर’, ‘कलयुग’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवून, आपण कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा सहजतेने साकारू शकतो, हे इमरानने सिद्ध केले आहे.

इमरान हाश्मीचा जन्म 24 मार्च 1979 रोजी मुंबईत झाला. त्याच्या वडिलांचे नाव अन्वर हाश्मी आणि आईचे नाव माहिरा हाश्मी आहे.

इमरान हाश्मीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत.

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘शांघाय’ यांसारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला तीनदा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले आहे.

इमरान हाश्मीने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सुमारे 40हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फूटपाथ’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

इमरान हाश्मी आणि परवीन साहनी यांनी 2006 मध्ये लग्न केले होते. त्यांना अयान हाश्मी नावाचा एक मुलगा देखील आहे.