बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

वास्तविक त्यांच्या लग्नाला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत आणि आता दोघांनीही त्यांच्या लग्नाची कायदेशीर नोंदणी न्यायालयात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.

गेल्या वर्षी 9 डिसेंबरला कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. या शाही लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजकेच लोक उपस्थित होते.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, विकी आणि कॅटने शनिवारी (19 मार्च) स्वतःच्या लग्नाची नोंदणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही कुटुंबासोबत दिसत होते. हा व्हिडीओ याच दिवसाचा असल्याचे मानले जात आहे.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या जोडप्याने संपूर्ण कुटुंबासह आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रत्येक जण कॅज्युअल लूकमध्ये दिसला होता.

कतरिनाची आई आणि विकी कौशलच्या आई-वडिलांशिवाय सनी कौशलही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाले होते.