मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतेच मृणालनं एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. पेस्टल पिंक कलरचा एनथिक ड्रेस, स्टोन आणि पर्लची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो मृणालनं शेअर केले. मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 'समथिंग स्पेशल कमिंग ऑन युअर वे', असं कॅप्शन मृणालनं या फोटोला दिलं आहे. गोल्डन नेक चोकर आणि गोल्डन छुमका ही ज्वेलरी देखील मृणालनं परिधान केली आहे. न्यूड आयशॅडो, ब्लॅक आयलाइनर, मस्कारा आणि न्यूड लिपस्टिक असा मेकअप देखील मृणालनं केला आहे. मृणालच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.